dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2026: सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील अनेक भागांमध्ये सिंचन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही ठिकाणची शेती ही पावसावर अजूनही अवलंबून आहे. पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यावर तोडगा म्हणून राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना चार लाखापर्यंत विहीर बांधण्यासाठी अनुदान मिळणार आहे. शेती करण्यास पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. या योजनेसाठी असणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा याची सविस्तर माहिती पुढे या लेखात दिलेली आहे. संपूर्ण लेख संपूर्ण वाचा.

पण या dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2026 च्या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याचे नावावरती ०.४० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत शेत जमीन असणे आवश्यक आहे. एवढे जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमार्फत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारचा या योजनेचा हेतू फक्त सिंचनपुरवठा होणे हा नाही. या योजनेमार्फत शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा आणि स्वावलंबी बनण्याच्या उद्देशाने योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला चार लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे.
dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2026
या योजने करता आवश्यक असणारी पात्रता
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी लाभार्थी म्हणजेच अर्जदार अनुसूचित जाती/ नव बौद्ध प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
- तसेच त्याचबरोबर शेतकरी लाभार्थ्याच्या नावावर सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. (शहरी भाग वगळून)
- लाभार्थी शेतकऱ्याकडे अधिकृत अधिकाऱ्यांचे स्वाक्षरीत जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- शेतकरी लाभार्थीकडे राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे.
- सर्वात महत्वाचं म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचे बँक अकाउंट आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे म्हणजेच आधार सीडिंग असणे आवश्यक आहे.
- जर लाभार्थी शेतकरी दारिद्र्यरेषेखालील BPL कार्डधारक असेल तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- जर लाभार्थी शेतकरी BPL कार्डधारक असेल तर ६ हेक्टर जमीन असण्याची मर्यादा लागू नाही.
- पण इतर शेतकऱ्यांकडे ०.४० ते ६ हेक्टर दरम्यान शेत जमीन असणे आवश्यक आहे.
- जर लाभार्थी दुर्गम भागातील असेल तर ०.४० हेक्टर पेक्षा कमी जमीन असल्यास एकत्र अर्ज केल्यावर पात्रता मिळू शकेल.
- शेतकरी लाभार्थ्यांनी एकदा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षे पुण्याला घेता येणार नाही.
- शेतकरी लाभार्थ्याकडे जुनी विहीर असल्यास २० वर्षानंतरच दुरुस्ती अनुदान मिळू शकेल.
- शेतकरी लाभार्थ्याने जर पूर्वी योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला असल्यास या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी लाभार्थ्याकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
- राज्य सरकारने महाडीबी पोर्टल सुरू केली आहे या पोर्टलवर महा आयडी तयार करून घेणे आवश्यक आहे तसेच या पोर्टल साठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही अट लागू केली आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा.
- सर्वात प्रथम शेतकरी लाभार्थ्याकडे महा आयडी असणे आवश्यक आहे. आणि फार्मर आयडीही असणे आवश्यक आहे.
- सर्वात प्रथम महाडीबीटी पोर्टलवर जावे.
- त्यानंतर खालती स्क्रोल करून शेती योजना अर्ज वरती क्लिक करावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर फार्मर आयडी टाकण्याचा ऑप्शन येईल तिथे फार्मर आयडी टाकून ओटीपी जनरेट करावा तो ओटीपी तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वरती येईल आलेला ओटीपी टाकून लॉगिन करावे.
- लगीन केल्यावर तुमच्यासमोर प्रोफाइल पूर्ण करण्याचे तुमची जात आणि बँक खाते दाबून प्रोफाइल 100% करावी.
- वरच्या बाजूला तुमच्यासमोर घटकासाठी अर्ज करा पर्याय दिसेल तिथे क्लिक करून तुमच्यासमोर योजनांच्या बाबी येथील त्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना त्याला क्लिक करा.
- त्यानंतर मागितल्याप्रमाणे सर्व डिटेल्स भरून सबमिट करा.
- अर्जंट झाल्यावर पुन्हा घटकासाठी अर्ज करा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा खालती कंडिशन क्लिक करून पेमेंट पूर्ण करा समीर झालेल्या अर्जाची पोहोच पावती प्रिंट काढून घ्या.
- अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता.
या योजनेचा अर्ज करण्याची आवश्यक लागणारी कागदपत्रे
- शेतकरी लाभार्थ्याकडे अद्यावत सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
- शेतकरी लाभार्थ्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे.
- शेतकरी लाभार्थ्याकडे पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
- शेतकरी लाभार्थ्याकडे जर शेतजमीन ०.४० हेक्टर पेक्षा कमी असेल किंवा एकत्र अर्ज करत असेल तर संयुक्त करार पत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकरी लाभार्थ्याने या अगोदर कोणत्या योजना लाभ घेतलेला नसेल तर स्वयंघोषणापत्र असणे आवश्यक आहे.
- सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवणे आवश्यक आहेत
अधिक माहितीसाठी संपर्क
- गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
- शक्य असल्यास पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधावा.
शेतकरी लाभार्थ्यांना dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2026 या योजने या योजनेची संपूर्ण माहिती मी अधिकृत GR वाचून तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवली आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा कॉन्टॅक्ट इमेज वर नक्की कळवा. असेच नवनवीन शेती योजना विषयक माहितीसाठी माझ्या सोशल मीडिया ग्रुपला जॉईन व्हा त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळू शकतील.
