maha sarathi id card apply: मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन बातमी आहे महाराष्ट्र शासनाने सध्याच महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाकडे डिजिटल पत्र असणे आवश्यक आहे असा निर्णय घेतला आहे. तर हे पत्र म्हणजे महाआयडी या MahaID द्वारे तुम्ही सर्व योजनांसाठी सहजरीत्या अर्ज करू शकता. केंद्र सरकारच्या आधार कार्ड प्रमाणेच हि राज्य शासनाची MahaID सर्व योजनांचा आणि सेवांचा डेटाबेस एकत्र जोडण्याचे काम करते. तर मित्रांनो या MahaID बद्दल सविस्तर माहिती पुढे या लेखात पाहू.

maha sarathi id card apply कशी करयची आणि संपूर्ण माहिती.
MahaID प्रमुख उद्देश कोणते?
- मित्रांनो तुम्हाला नवनवीन सरकारी योजनांचे अर्ज करताना प्रत्येक वेळी जात उत्पन्न आणि रहिवासी दाखला पुन्हा पुन्हा अपलोड करावे लागू नयेत यासाठी हि MahaID आवश्यक आहे.
- सर्व योजनांचे अनुदान रक्कम थेट बँक खात्यात DBT जमा करताना होणारा अडथळा आणि बनावट लाभार्थ्यांची नावे वगळणे सोपे होणार आहे.
- मित्रांनो आपले सर्व शैक्षणिक, शेती विषयक, सामाजिक आणि कौटुंबिक रेकॉर्ड एका सुरक्षित ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी हि MahaID महत्वाची आहे.
- मित्रांनो दाखले आणि योजनांच्या अर्जाची पडताळणी करून मानवी हस्तक्षेपाशिवाय डिजिटल पद्धतीने वेगाने जलद मंजुरी मिळू शकेते.
MahaID चे नागरिकांना होणारे फायदे.
- मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे संजय गांधी निराधार योजना, शेतकरी सन्मान निधी विविध शिष्यवृत्ती योजना, कृषी योजना अवजारांची अनुदान यांसारखे सर्व योजना या MahaID शी थेट जोडल्या जाणार आहेत.
- मित्रांनो डिजिलॉकरला जोडलेल्या मूळ दाखल्यांच्या डिजिटल प्रति थेट पडताळल्या जातात. सारखे सारख्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडत नाही.
MahaID साठी आवश्यक असणारी कागदपत्रे.
- मित्रांनो सर्वात प्रथम लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
- आधार लिंक मोबाइल नंबर.
- कारण ही सर्व प्रोसेस आधार कार्ड वर आधारित आहे.
Also Read:- पिक कर्ज योजना
MahaID साठी अर्ज कसा करावा?
- मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला mahasarathi.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती प्रवेश करावा लागेल.
- या वेबसाईट वरती गेल्यावरती तुमच्यासमोर होमपेज ओपन होईल.
- तुमच्यासमोर एक पॉपअप येईल तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी इथे कॉलम दिसते तीथे आधार नंबर टाका आणि क्लिक करून ओटीपी सोडा.
- तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट करा नंतर तुमच्यासमोर संमती मागली जाईल त्याचबरोबर मोबाईल नंबर हि मागला जाईल ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल मोबाईल नंबर राखाण्यात टाकून पुन्हा ओटीपी सोडा आणि आलेला OTP टाकून कॅप्चा टाकून शेवटी अर्ज सबमिट करा.
- मित्रांनो तुम्ही केलेला अर्ज हा 24 तासात Approved होऊन तुम्हाला महा आयडी प्राप्त होईल.
- त्यानंतर आधार क्रमांक टाकून लॉगिन करून महा आयडी डाऊनलोड करून घ्या.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नवीन ओळखपत्र बद्दलची माहिती हि अधिकृत वेबसाईटचा अभ्यास करून तुमच्यासमोर मांडली आहे. आणि तुम्ही maha sarathi id card apply कशी करायची हे तुम्ही नक्कीच शिकला असाल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा काही शंका किंवा तृटी असल्यास नक्की विचारा मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करीन. असेच नवनवीन योजना विषयक अपडेट साठी माझ्या Social media group फॉलो करा.
