pragati shishyavrutti yojana: मुलींना मिळणार रु.५०,०००/-

pragati shishyavrutti yojana: आपल्या तरुण मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बातमी अशी आहे ज्या मुली उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहेत व स्वतःच्या पायावर उभे राहायचं आहे त्यांच्यासाठी सरकारने प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर मुलींसाठी तंत्र शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. मात्र हुशार आणि होतकरू मुलींना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही व ते अर्धवट सोडून देतात. त्यामुळे तांत्रिक शिक्षणातील हा अर्थ दूर करण्यासाठी भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने एक मोठे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा करणाऱ्या मुलींसाठी दिलासा देण्यासाठी प्रगती शिष्यवृत्ती योजना राबवली आहे. तर मैत्रिणींनो आपण या योजनेची सविस्तर माहिती पुढे या लेखात पाहणार आहोत.

pragati shishyavrutti yojana

मैत्रिणींनो या योजनेचा खरा उद्देश आणि मुख्य म्हणजे तुम्हाला तांत्रिक शिक्षण मिळणे हा आहे. तुमच्यातील कौशल्य वाढवणे आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. तर या योजनेसाठी पात्र कोण ठरेल किती रक्कम मिळेल अर्ज कसा करावा तर पुढे पहा.

pragati shishyavrutti yojana

प्रगती शिष्यवृत्ती योजनेचे मुख्य फायदे

  • मैत्रिणींनो या योजनेमार्फत तुम्हाला दरवर्षी ५० हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल.
  • प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त तीन वर्षे आणि थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्यांसाठी जास्तीत जास्त दोन वर्ष इतका कालावधी राहील.
  • मैत्रिणींनो ही रक्कम फक्त तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन फी, शैक्षणिक पुस्तके, स्टेशनरी, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि शैक्षणिक सॉफ्टवेअर खरेदी करण्यासाठी वापरू शकता.
  • मैत्रिणींनो या योजनेमार्फत तुम्हाला होस्टेल किंवा वैद्यकीय खर्चासाठी कोणतेही अतिरिक्त रक्कम दिली जाणार नाही.

हि योजना पण पहा – craftsman training scheme maharashtra: मिळणार ५००/- रुपये महिन्याला | कारागीर प्रशिक्षण योजना.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता pragati scholarship eligibility

  • सर्वातप्रथम ही योजना मुलींसाठीच आहे.
  • लाभार्थी विद्यार्थिनीने AICTI मान्य प्राप्त संस्थेत तांत्रिक पदविका (technical diploma) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कौटुंबिक उत्पन्न चालू आर्थिक वर्षात ८ लाखापेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थी विद्यार्थ्यांचे कुटुंबातील फक्त दोन मुलीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ईशान्य कडील राज्य तसेच जम्मू आणि काश्मीर, लढाक, अंदमान निकोबार यांसारख्या राज्यातील विद्यार्थिनींना या योजनेचा विशेष प्राधान्य दिले जाईल.

प्रगती शिष्यवृत्ती योजना साठी अपात्र कोण ठरणार

  • जर लाभार्थी विद्यार्थिनी पुढील वर्षात नापास झालेली असेल किंवा तिने शिक्षण मध्ये सोडले असेल तर ती या योजनेसाठी अपात्र ठरेल व तिची पुढील वर्षाची रक्कम बंद होईल.
  • शिक्षण घेत असताना लाभार्थी विद्यार्थिनी इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी स्त्रोतांकडून स्टायपेंड पगार किंवा दुसरी शिष्यवृत्ती घेत असेल तर ती ह्या योजनेसाठी अपात्र ठरेल.
  • आधीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि पदविका वर्षे यामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त गॅप असल्यास ती विद्यार्थ्यांना अपात्र ठरेल.

प्रगती शिष्यवृत्ती योजना साठी आवश्यक असण्याची कागदपत्रे

  • लाभार्थी विद्यार्थिनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व तिच्याकडे गुणपत्रिका/ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थिनी इयत्ता बारावी आयटीआय पदविका उत्तीर्ण/ प्रमाणपत्र लागू असल्यास आवश्यक आहे.
  • आधार कार्ड
  • लाभार्थी विद्यार्थिनीकडे चालू शैक्षणिक वर्षाचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी विद्यार्थिनीकडे राष्ट्रीयकृत बँकेचे अकाउंट असणे आवश्यक आहे. आणि त्या अकाउंट च्या पासबुकची प्रिंट असणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी विद्यार्थिनीकडे चालू स्थितीतील पासवर्ड साईज फोटो असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी विद्यार्थिनीकडे शिकत असलेल्या संबंधित विद्यालयाचे अभ्यास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • पालकांचे घोषणापत्र आणि बँक आदेश प्रपत्र असणे आवश्यक आहे.

प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करावा. pragati scholarship how to apply

  • विद्यार्थिनींना सर्वात प्रथम अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद या अधिकृत संकेतस्थळावर जा. न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायातील क्लिक करून त्यातील मार्गदर्शन तत्त्वे काळजीपूर्वक वाचा. मागितल्याप्रमाणे आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा. नंतर रजिस्ट्रेशन केल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर अर्ज आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल.
  • तुम्हाला प्राप्त झालेला आयडी पासवर्ड टाकून पुन्हा लॉगिन करा.
  • सुरक्षेसाठी मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून नवीन पासवर्ड जनरेट करा.
  • त्यानंतर डॅशबोर्ड वरती जाऊन तुमच्यासमोर एप्लीकेशन फॉर्म दिसेल तो फॉर्म उघडा आणि त्यामध्ये वैयक्तिक माहिती पत्ता आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
  • सर्व माहिती भरून झाल्यावरती खालती तुमच्यासमोर कागदपत्र अपलोड करण्याचा ऑप्शन दिसेल तिथे आवश्यक ती कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा. त्यामध्ये अनेक कागदपत्रांची पडताळणी ही डिजिलॉकरने केली जाते.
  • पूर्ण भरलेल्या अर्ज पुन्हा एकदा वाचा बरोबर असल्याची खात्री करून सबमिट बटन वरती क्लिक करा. अर्ज सिमेंट झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

तुमच्या अर्जाचा पेमेंट स्टेटस कसा तपासावा

मैत्रिणींनो एकदा तुमचा शिष्यवृत्ती चा अर्ज मंजूर झाला तर त्या शिष्यवृत्तीचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होतील. लक्षात घ्या जे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे तिथेच पैसे जमा होणार. हे पैसे जमा झाले आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी सरकारच्या सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीच्या पोर्टलला भेट द्या म्हणजे तुम्हाला समजेल. know your payment या पर्यावरण क्लिक करून बँक खाते क्रमांक किंवा NSP एप्लीकेशन आयडी टाकून पैशांची स्थिती पाहू शकता.

अशाप्रकारे या आर्थिक कारणांमुळे लाभार्थी विद्यार्थिनी जी शिकण्यास इच्छुक आहे व तिचे शिक्षण थांबू नये या हेतूने सरकारने सुरू केलेली pragati shishyavrutti yojana हि मुलींसाठी खूप फायदेशीर आहे. मैत्रिणींनो या लेखात दिलेली माहिती अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यावरून तुम्ही अधिकृत माहिती मिळवा. जर ही माहिती तुम्हाला फायदेशीर वाटले असेल तर मला नक्की कमेंट करा. त्यामुळे मला आणखी तुमच्यासमोर माहिती पोहोचण्यासाठी उस्तुकता वाढेल. अशाच नवनवीन योजनेचा अपडेट साठी माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.

Leave a Comment