craftsman training scheme maharashtra: मिळणार ५००/- रुपये महिन्याला

craftsman training scheme maharashtra: सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे कारागीर प्रशिक्षण योजना ही राबवली जात आहे. तर मित्रांनो आपण या योजनेमध्ये सविस्तर माहिती पुढे या लेखात पाहणार आहोत इतर हा लेख संपूर्णपणे वाचा.

आपल्या शहरी तसेच ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींना दहावी आणि बारावीनंतर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आयटीआय मध्ये तांत्रिक शिक्षणाची निवड करतात. यामध्ये मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या घरच्या परिस्थिती मुळे वही पुस्तके खरेदी करणे प्रवास आणि दैनंदिन शैक्षणिक खर्च भागवणे शक्य होत नाही. अशा अडचणी येत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्यावसायिक शिक्षण थांबू नये म्हणून शासनाने ही कारागीर प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.

craftsman training scheme maharashtra या योजनेच्या माध्यमातून थेट सरकार विद्यार्थ्याला आर्थिक मदत करणार आहे. मित्रांनो या योजनेचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचा आर्थिक परिस्थितीवर लक्ष न देता थेट कौशल्यावर लक्ष केंद्रित होऊ शकते आणि त्यांना त्याचे मानसिक बळ मिळते. जेव्हा विद्यार्थ्यांना असे आर्थिक बळ मिळते तेव्हा त्यांचे मनोबल ही वाढते. काही मुलं आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडतात तर आता थेट विद्यार्थी टेन्शन न घेता आपला कोर्स जिद्दीने पूर्ण करतील. मित्रांनो हा शासनाचा उपक्रम फक्त विद्यार्थ्याला शिकवत नाही तर जे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी बनवण्याचे मार्ग दाखवत आहे.

कारागीर प्रशिक्षण योजनेचा सर्वात मोठा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यात उत्तम आणि कुशल कारागीर घडवणे हाच आहे. मित्रांनो आजच्या काळात विविध कारखाने उद्योग आणि नव्या प्रकल्पामध्ये तांत्रिक ज्ञान असलेल्या कारागिरांची खूप प्रचंड प्रमाणावर गरज असते. या शासनाच्या नवीन योजनेमुळे नवीन होतकरू मुलमुले प्रशिक्षित होऊन बाहेर पडू शकतील. त्यामुळे त्यांना चांगल्या रोजगाराची संधी मिळू शकेल. आणि त्याचबरोबर राज्याचे एकूण औद्योगिक विकासालाही मोठी गती मिळू शकेल.

craftsman training scheme maharashtra

कारागीर प्रशिक्षण योजनेचा फायदा

मित्रांनो या योजनेमार्फत दर महिन्याला ५००/- रुपये शिष्यवृत्ती तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

कारागीर प्रशिक्षण योजनेसाठी असणारी पात्रता

  • सर्वात प्रथम अर्जदार महाराष्ट्र शासनाचा रहिवासी असावा.
  • अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, अल्पसंख्याक समुदाय आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या मागासलेला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ८,००,०००/- पेक्षा जास्त नसावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील केवळ २ भावंडे या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
  • अर्जदार प्रशिक्षणार्थीचे सरासरी ८०% उपस्थिती राखली पाहिजे.
  • मित्रांनो २ वर्षाच्या व्यवसायात नाव नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षणार्थी प्रथम वर्ष उत्तीर्ण असलेला असावा.
  • मित्रांनो अनुसूचित जातीचे २,५०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले प्रशिक्षणार्थी देखील मॅट्रिक नंतरच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत.
  • मित्रांनो अखिल भारतीय व्यापार चाचणीसाठी निलंबित किंवा अपत्र आढळलेले प्रशिक्षणार्थी या योजनेसाठी अपात्र ठरणार.
  • मित्रांनो GITI सोडून गेलेले प्रशिक्षणार्थी त्यांच्या सुटण्याच्या तारखेपासून पात्र नसतील.
  • PITI मधील प्रशिक्षणासाठी या योजनेसाठी अपात्रच आहेत.

कारागीर प्रशिक्षण योजनेसाठी असणारी आवश्यक कागदपत्रे

  • पारपत्र आकाराचे छायाचित्र
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • प्रवेश पुरावा सरकारी ITI कडून प्रवेश पत्र किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • बँक खात्याचा तपशील अर्जुनाकडे राष्ट्रीयकृत बँकेचा आधार कार्ड ची लिंक बँकेत असणे आवश्यक आहे बँक खाते दर्शवणारी पासबुक प्रत असणे आवश्यक
  • मागील वर्षाचे गुणपत्रक शैक्षणिक कामगिरीचा पुरावा आणि दुसऱ्या वर्षात सदस्य पूर्ण लाभासाठी पात्र असण्यासाठी आवश्यक
  • जातीचे प्रमाणपत्र

कारागीर प्रशिक्षण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरावा

  • सर्वात प्रथम लाभार्थी अर्जदाराने सर्व कागदपत्र स्कॅन करून ठेवणे आवश्यक आहेत.
  • तर प्रथम MahaDBT संकेतस्थळावरती जावे.
  • महाडीबीटी पोर्टल वरती गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करा आणि अर्जदाराचे नाव वापर करता नाव ईमेल आयडी मोबाईल नंबर टाका.
  • कॅपच्या आणि मोबाईल वरती आलेला ओटीपी भरा आणि नोंदणीवर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉगिन वर क्लिक करा LOGIN ID आणि PASSWORD टाकून लॉगिन करा.
  • लॉगिन झाल्यावर तुमच्यासमोर विंडो ओपन होईल ते वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती चालू अभ्यासक्रम इत्यादी भरा.
  • सुचवलेल्या पात्र योजना पहा आणि तुमची योजना निवडा.
  • त्यानंतर योजनेसाठी अर्ज करा आणि संबंधित कागदपत्रे आठवणीने अपलोड करा.
  • अर्ज सबमिट झाल्यावर तुम्हाला एप्लीकेशन आयडी मिळेल.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेचा ऑनलाईन अर्ज करू शकता.

मित्रांनो ही craftsman training scheme maharashtra मेहनती आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. या योजनेची माहिती मी अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेली आहे. जर या माहिती तुम्हाला काही त्रुटी आढळले असतील किंवा चुकीचे वाटत असेल तर मला नक्की कळवा. अशाच नवनवीन योजनेचे अपडेट साठी माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.

Leave a Comment