pik karj yojana maharashtra: शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या शेतकरी मित्रांना ही शेती करण्यासाठी आर्थिक मोठ्या प्रमाणात गरज असते. ती गरज म्हणजे अवजारे खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे. गरीब शेतकरी एवढी मोठी रक्कम एकदम जमा करू शकत नाही. तर त्यासाठी एक सरकारने पीक कर्ज योजना राबवली आहे. शेतकऱ्याच्या सातबारा वरती पीक कर्ज देण्यात येणार आहे. तर या योजनेसाठी पात्र कोण असेल लागणारी कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती पुढे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पुढे पाहूया.

pik karj yojana maharashtra
शेतकरी मित्रांनो आधी आपण जाणून घेऊया पीक कर्ज म्हणजे काय? what is crop loan?
शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करण्यासाठी लागणारे भांडवल किंवा शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी जे आपण कर्ज घेतो ते म्हणजे पीक कर्ज होय. मित्रांनो जे आपण नॉर्मल कर्ज घेतो त्याचप्रमाणे असते पण हे पीक कर्ज आपण फक्त शेतीसाठी वापरू शकतो. म्हणजे आपण पर्सनल लोन घेतो ते आपण स्वतःसाठी युज करू शकतो वैयक्तिक वापरू शकतो.
आपल्याला पीक कर्ज कसे मिळेल?
तर शेतकरी मित्रांना प्रश्न उद्भव होईल की पीक कर्ज कसे मिळेल याची माहिती कुठे मिळेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या पीक कर्जाची माहिती राष्ट्रीयकृत बँकेत भेटेल आंतरराष्ट्रीय बँकेत तुमचे जुने अकाउंट असणे आवश्यक आहे तर तुम्ही लगेच अर्ज करू शकता. या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला तलाठी कडून घ्यावी लागतील. Pic karj information in Marathi
शेतकरी मित्रांनो या पीक कर्ज योजनेचे काम घेण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असणारी कागदपत्रे.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या पीक कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खाली दिलेली पूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ८ अ उतारा ही असणे आवश्यक आहे.
- कोणतेही कर्ज नसलेल्या सोसायटीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- ज्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या क्षेत्रात बँक असेल तर त्या बँकेकडून कर्ज नसल्याचा दाखला घेणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अधिकृत बँकेचे खाते
शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी पीक कर्ज देण्यासाठी खालील प्रमाणे चांगले बँका आहेत.
- State Bank of India
- Union Bank of India
- Bank of India
- Bank of Maharashtra
- Bank of Baroda
- HDFC Bank
- Central Bank of India
- Dena Bank
- Punjab National Bank
Also Read:- भाऊसाहेब फुंडकर फळबाघ लागवड योजना
शेतकरी मित्रांनो पीक कर्जासाठी अर्ज कसा करायचा.
शेतकरी मित्रांनो या पिक कर्ज योजनेचा अर्ज करण्यासाठी प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात वेगळी पद्धत असते. काही राज्यांमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज घेतला जातो. जर काही राज्यांमध्ये ऑफलाइन अर्ज मागणी केली जाते म्हणजे सरळ बँकेत जाऊन अर्ज करावा लागतो त्यांची प्रोसेस करावी लागते. तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पीक कर्ज मिळवायचे असेल तर तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन माहिती घ्या. जर बँक वाले बोलले ऑनलाईन अर्ज करा तसेच ऑनलाईन करा मला तर तुमच्याकडून ते ऑफलाइन कागद मागणी करतील. पण शेतकरी मित्रांनो वर दिलेली आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा. कारण ती कागदपत्रे खूप महत्त्वाचे आहेत त्याशिवाय तुम्हाला पीक कर्ज मिळणार नाही.
पीक कर्जाचा व्याजदर किती असतो?
तर मित्रांनो कर्ज म्हटल्यावर व्याजदर असतोच तर सर्व शेतकऱ्यांना एकच भीती असते ही पीक कर्जाला व्याजदर किती असते. शेतकरी मित्रांनो प्रत्येक बँकेचा व्याजदर हवे वेगळा असतो. तर काही बँकांचा व्याजदर जास्त असू शकतो व काही बँकांचा व्याजदर कमी असू शकतो. त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या बँकेत कर्ज घेणार आहात त्या बँकेकडून व्याजदराची माहिती करून घ्या. किती व्याजदर आहे याची खात्री करून घ्या. शेतकरी मित्रांनो पीक कर्जाच्या व्याजाची माहिती घेतल्याशिवाय अर्ज करू नका. शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर पीक कर्ज योजनेचा व्याजदर हा कमीत कमी ८ % एवढा असतो तर जास्तीत जास्त १५% एवढा असतो. ज्या तुम्ही बँकेत पीक कर्ज घेणार आहात त्या बँकेकडून व्याजदराची माहिती करून घ्या. बँकांचे नियमानुसार बँक व्याजदर कमी किंवा जास्त असू शकतो. खात्री करून घेतल्यावरच पीक कर्जासाठी अर्ज करा.
शेतकरी मित्रांनो पीक कर्जामुळे तुम्ही तुमच्या शेतीसाठी लागणारी अवजारे खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्हाला शेती करणे अधिक सोपे जाईल. या पीक कर्जामुळे तुम्हाला आर्थिक बळ मिळेल. pik karj yojana maharashtra ची या लेखात दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. चूक किंवा काही शंका असल्यास नक्की विचारा मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. अशाच नवीन शेती विषयक योजना साठी माझ्या सोशल मीडिया ग्रुपला जॉईन व्हा.
