bhausaheb fundkar falbag yojana 2026: मिळणार फळबाग अनुदान

bhausaheb fundkar falbag yojana: आपल्या शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक योजनेबद्दल माहित नसेल ती म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. मित्रांनो ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत लाभार्थी शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. आणि या योजनेचे लाभ आपण 2026 मध्ये कसा घेऊ शकतो हे पाहणार आहोत. तर या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पुढे पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख मित्रांनो पूर्णपणे वाचा.

bhausaheb fundkar falbag yojana

मित्रांनो ही bhausaheb fundkar falbag yojana २०१८-१९ पासून राज्यात चालू करण्यात आली आहे. मित्रांनो या योजनेमध्ये केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जे लाभार्थी शेतकरी लाभ घेऊ शकत नाही. त्या शेतकऱ्यांना या योजनेमार्फत लाभ देण्यात येणार आहे. सदर योजना ही शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०% टक्के आणि दुसऱ्या वर्षी ३०% व तिसऱ्या वर्षी २०% असे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडासाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे.

शेतकरी मित्रांनो जर हे प्रमाण कमी झाले असल्यास शेतकऱ्यांने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास्त १० हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीत जास्त ६ हेक्टर क्षेत्र मर्यादित लाभ घेऊ शकतो. जे लाभार्थी शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र आहेत त्या लाभार्थ्यांना प्रथम योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे. उर्वरित क्षेत्रासाठी वरील क्षेत्र मर्यादेप्रमाणेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अल्प, अत्यल्प, भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

अनुदान :- मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणी करिता १००% अनुदान देण्यात येईल.

bhausaheb fundkar falbag yojana

योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता

  • लाभार्थी शेतकऱ्याला फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसवणे अनिवार्य आहे.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकरी लाभार्थ्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे त्या शेतकऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. व त्यानंतर अन्य शेतकरी लाभार्थ्याचा विचार करण्यात येईल. या योजनेचा लाभ फक्त वैयक्तिक शेतकरी घेऊ शकतो मात्र संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
  • शेतकरी लाभार्थ्यांच्या नावावर ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे. संयुक्त सामायिक मालकी असलेले शेतकऱ्यास इतर खातेदारांकडून संमती घेणे आवश्यक आहे. तसेच स्वतःच्या हिस्साप्रमाणे लाभ घेता येईल.
  • ७/१२ वरती कुळाचे नाव असल्यास शेतकरी लाभार्थ्याने कुळाची संमती घेणे आवश्यक आहे.
  • जे शेतकरी परंपरागत व निवासी आहेत ते वन अधिकार मान्यता अधिनियम २००६ नुसार वनपट्टेधारक म्हणून लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • शेतकरी लाभार्थ्याने इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यातीप्रमाणे लाभ घेता येईल.

योजने करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर ७/१२ व ८ अ उतारा असणे अनिवार्य आहे.
  • हमीपत्र
  • संयुक्त खातेदार असल्यास सर्व खासदारांची संमती पत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अनुजमाती)

योजनेचा अर्ज कसा करावा

  • सर्वात प्रथम शेतकरी लाभार्थ्याकडे Farmer ID असणे आवश्यक आहे त्याचबरोबर MahaID तयार केलेली पाहिजे.
  • सर्वात प्रथम MahaDBT पोर्टल वर जावे.
  • MahaDBT पोर्टल वरती गेल्यावरती शेती योजना लाभ हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर फार्मर आयडी मागली जाईल किंवा आधार क्रमांक टाकून ओटीपी जनरेट करून लॉगिन करा.
  • त्यानंतर तुमची प्रोफाईल १००% पूर्ण करा जात आणि अपंगत्व (होय किंवा नाही) निवडा बँक डिटेल्स टाका नंतर तुमची प्रोफाइल पूर्ण होईल.
  • त्यानंतर घटकासाठी अर्ज या पर्यायावर क्लिक करा नंतर तुमच्यासमोर बाबी निवडा येतील त्यामध्ये तुम्ही फलोत्पादन ही बाबी निवडा व त्यामध्ये तुम्हाला bhausaheb fundkar falbag yojana दिसेल तिथे क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
  • अर्ज भरल्यानंतर पुन्हा घटकासाठी अर्ज करून पेमेंट पूर्ण करा आणि भरलेल्या अर्जाची पोच पावती घ्या.
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता.

मित्रांनो या योजनेची माहिती मी अधिकृत पोर्टलवरून घेऊन तुमच्यासमोर सोप्या भाषेत दिलेली आहे. जर या माहिती मध्ये तुम्हाला काही चुका किंवा तुरटी वाटत असल्यास मला नक्की कळवा संपर्क साधा. असे नवनवीन योजना विषयक अपडेट साठी खाली दिलेल्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ला जॉईन व्हा.

1 thought on “bhausaheb fundkar falbag yojana 2026: मिळणार फळबाग अनुदान”

Leave a Comment